Home Breaking News अहमदाबाद विमान अपघात: डॉक्टर हॉस्टेलवर विमान कोसळले; जीवघेणा स्फोट, मृतांचा आकडा वाढण्याची...

अहमदाबाद विमान अपघात: डॉक्टर हॉस्टेलवर विमान कोसळले; जीवघेणा स्फोट, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

32
0

अहमदाबाद | प्रतिनिधी:- अहमदाबाद शहरातील मेघानी नगर परिसरात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भयावह अपघात घडला, जेव्हा अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान थेट डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या घटनेने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी आगीत भस्मसात झालेल्या इमारतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घटनास्थळी विनाशाचं दृश्य

ज्या इमारतीवर विमान कोसळलं, ती इमारत सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्सचं वसतिगृह आहे. या ठिकाणी अपघातानंतर मोठा स्फोट झाला असून इमारतीचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे. अनेक डॉक्टर आणि कर्मचारी इमारतीत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विमानाने टेकऑफ करताच दिला ‘MAYDAY’ कॉल

विमान उड्डाण करताच पायलटने जवळील एअर ट्रॅफिक कंट्रोलला ‘MAYDAY’ (आपत्कालीन) सिग्नल दिला, मात्र काही क्षणांतच संपर्क तुटला आणि विमान कोसळले. यावरून अंदाज घेतला जातो की, यंत्रणेत गंभीर बिघाड झाला होता आणि पायलटला इमरजन्सी लँडिंगचा प्रयत्नही करता आला नाही.

बचावकार्य सुरू; अनेक एजन्सी युद्धपातळीवर कामाला लागल्या

जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार – “२ ते ३ मिनिटांतच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या ७०-८०% परिसर साफ करण्यात आला आहे. ग्रीन कॉरिडोर तयार करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले जात आहे. प्राथमिकता जखमींच्या मदतीला देण्यात येत आहे.”

विमान अपघातामुळे लागलेल्या आगीने हाहाकार

विमान कोसळल्यावर प्रचंड स्फोट झाला आणि त्यानंतर मोठी आग लागली. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. हॉस्टेलच्या आसपासची वाहने, झाडं आणि इमारतींनाही नुकसान झालं आहे. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्य सुरू होईपर्यंत धाडस दाखवून अडकलेल्यांना मदत केली.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या अपघातात कित्येक डॉक्टर आणि हॉस्टेलमधील कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याचं प्राथमिक वृत्त आहे. काही जणांच्या जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा लवकरच जाहीर होणार आहे.

विमानात होते 242 प्रवासी; क्रू यादी आधीच प्रसिद्ध

या विमानात एकूण 242 प्रवासी व कर्मचारी होते. त्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही विमानात होते, मात्र सुदैवाने ते सुखरूप असल्याचे समजते.

देशभरातून शोक व्यक्त; मदतीचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. हॉस्पिटल्स, ब्लड बँक्स, आणि स्वयंसेवी संस्था सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Previous articleलायन्स इंटरनॅशनलच्या ‘नया सवेरा’ उपक्रमाने दृष्टिहीनांना मिळणार नवजीवन! – नवनियुक्त प्रांतपाल राजेश अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती
Next articleअहमदाबाद विमान दुर्घटना: तटकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर! अपर्णा महाडिक यांचे अपघातात दुर्दैवी निधन
Darjedarnama Digital News Channel is a modern news platform focused on delivering the latest news and insightful analysis from around the world. With a commitment to factual reporting and in-depth coverage, Darjedarnama aims to keep its audience informed about current events, politics, technology, culture, and more. The channel leverages digital technology to provide real-time updates and multimedia content, ensuring that viewers receive the most comprehensive and engaging news experience possible. Through its dedicated team of journalists and correspondents, Darjedarnama strives to uphold the highest standards of journalism and maintain a strong connection with its audience.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here