Home Breaking News लायन्स इंटरनॅशनलच्या ‘नया सवेरा’ उपक्रमाने दृष्टिहीनांना मिळणार नवजीवन! – नवनियुक्त प्रांतपाल राजेश...

लायन्स इंटरनॅशनलच्या ‘नया सवेरा’ उपक्रमाने दृष्टिहीनांना मिळणार नवजीवन! – नवनियुक्त प्रांतपाल राजेश अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती

21
0

प्रतिनिधी | पुणे :- लायन्स इंटरनॅशनल ही जगभरात सामाजिक सेवेचे भक्कम कार्य करणारी अग्रगण्य संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ करण्यात आला आहे. डिस्ट्रिक्ट 3234D2 चे नवनियुक्त प्रांतपाल राजेश अग्रवाल यांनी ‘नया सवेरा’ या महत्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करत, दृष्टिहिन नागरिकांना नवसंजीवनी देण्याची ग्वाही दिली.

🔸 समाजसेवेचा वसा ‘नया सवेरा’तून पुढे नेणार

राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “‘नया सवेरा’ हा उपक्रम दृष्टिहीन नागरिकांच्या जीवनात नवा प्रकाश आणण्यासाठी राबवला जाणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये अंधत्व निर्मूलनासाठी व्यापक स्वरूपात काम करण्यात येईल. यामध्ये देशातील लाखो गरजू नागरिकांना मोफत नेत्र तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया करून दृष्टिदान दिलं जाईल.”

🔸 पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये ५.५ हजार सदस्य सक्रीय

लायन्स डिस्ट्रिक्ट 3234D2 अंतर्गत पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील ११४ क्लब्समधून सुमारे ५,५०० सदस्य आणि १ लाख स्वयंसेवक कार्यरत आहेत. दरवर्षी ५ लाखांहून अधिक नागरिकांना या उपक्रमांमधून मदतीचा हात दिला जातो.

🔸 वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारी कामगिरी

▪ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया – दरवर्षी ५ हजार रुग्णांवर
▪ १००+ डायलिसिस मशीन्सद्वारे उपचार
▪ मोफत ओपीडी, दंत आणि फिजिओथेरपी सेवा केंद्रे
▪ २ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व उपचार
▪ गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जनजागृती आणि मोफत लसीकरण

🔸 ‘नवा सवेरा’सह अनेक उपक्रम लवकरच राबणार

राजेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, “लायन्स क्लब केवळ एक सेवा संस्था नसून ती एक समाजहितासाठी झटणारी चळवळ आहे. समाजात उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देणे हे आमचे कार्य आहे. यामुळे ‘नया सवेरा’ उपक्रमासह आम्ही अनेक नवीन प्रकल्प राबवणार आहोत, ज्यातून जनतेला प्रत्यक्ष लाभ होईल.”

🔸 पत्रकार परिषदेस अनेक मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला लायन्स क्लबचे माजी इंटरनॅशनल डायरेक्टर नरेंद्र भंडारी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री, कॅबिनेट सचिव सलील कारखानीस, कॅबिनेट कोषाध्यक्ष रामचंद्र शाह, तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔸 समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा संकल्प

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, बालकांसाठी उपक्रम, युवासेवा आणि अन्नदान – अशा विविध क्षेत्रांत लायन्स क्लब आपल्या सामाजिक बांधिलकीचे प्रदर्शन करत आहे. राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात आता या कार्याला आणखी व्यापक आणि प्रभावी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Previous articleअहमदाबाद विमान अपघात: दुर्दैवी घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, विजय रूपाणींचीही उपस्थिती होती!
Next articleअहमदाबाद विमान अपघात: डॉक्टर हॉस्टेलवर विमान कोसळले; जीवघेणा स्फोट, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here