Home Breaking News पुष्पक एक्स्प्रेसमध्ये मोठी दुर्घटना! दरवाज्यात लटकलेले प्रवासी रेल्वे ट्रॅकवर कोसळले; ५ मृत्यू,...

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये मोठी दुर्घटना! दरवाज्यात लटकलेले प्रवासी रेल्वे ट्रॅकवर कोसळले; ५ मृत्यू, १० हून अधिक गंभीर जखमी

35
0

मुंबई – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी अतिशय हृदयद्रावक आणि भीषण अशी घटना घडली आहे. मुंबई-लखनौ दरम्यान धावणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना सकाळच्या भरगच्च गर्दीत दिवा व मुंब्रा स्थानकादरम्यान घडली.

कसाऱ्याच्या दिशेने जात असलेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधून १२ पेक्षा अधिक प्रवासी ट्रॅकवर कोसळले. यामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ८-१० जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेवर प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

 तातडीने रुग्णालयात हलवले, पण…

ही दुर्घटना सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने अॅम्ब्युलन्स मागवून जखमींना कळवा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी ५ जणांना मृत घोषित केलं.

 दरवाज्यात लटकले होते प्रवासी

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यांमध्ये नेहमीच मोठी गर्दी असते. प्रवासी दारात लटकले होते आणि गाडी झपाट्याने जात असताना तोल जाऊन ते ट्रॅकवर कोसळले, अशी प्राथमिक माहिती आहे. सकाळच्या शिफ्टला जाणाऱ्या हजारो कामगारांमुळे ही गाडी ओसंडून वाहत होती.

 अधिकृत माहिती अजूनही स्पष्ट नाही

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी नक्की कोणत्या डब्यातून पडले आणि नेमकी दुर्घटना कशी घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने ही बाब लक्षात आणून दिली, आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तपास सुरु केला.

 रेल्वे प्रशासनाची लापरवाही?

या घटनेनंतर रेल्वेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनावर गर्दीच्या डब्यांमध्ये सुरक्षेचा अभाव असल्याची गंभीर टीका केली आहे. मुंबई लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये वर्षानुवर्षे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 मृतांना श्रद्धांजली आणि सुरक्षा उपायांची मागणी

या घटनेने संपूर्ण शहराला हादरवून टाकले असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिक आणि प्रवासी संघटनांनी रेल्वेकडून भरपाई आणि प्रवाशांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पुष्पक एक्स्प्रेसमधून दरवाज्यातून कोसळले प्रवासी; पाच जण ठार, १० जखमी – मुंबई लोकल व्यवस्थापन पुन्हा कटघऱ्यात!

Previous article२० वर्षांचा अंधार संपला! आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नांना यश; काळभोर नगर आणि मोहन नगरला अखेर स्थिर वीजपुरवठा
Next articleसप्तकुंड धबधब्यावर मधमाशांचा थरकाप – २०० हून अधिक पर्यटक जखमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घबराट!
Darjedarnama Digital News Channel is a modern news platform focused on delivering the latest news and insightful analysis from around the world. With a commitment to factual reporting and in-depth coverage, Darjedarnama aims to keep its audience informed about current events, politics, technology, culture, and more. The channel leverages digital technology to provide real-time updates and multimedia content, ensuring that viewers receive the most comprehensive and engaging news experience possible. Through its dedicated team of journalists and correspondents, Darjedarnama strives to uphold the highest standards of journalism and maintain a strong connection with its audience.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here